कुतुबमिनार हे एक स्मारक, प्रार्थनास्थळ नव्हे; ASI चे कोर्टात उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kutubminar

कुतुबमिनार एक स्मारक, प्रार्थनास्थळ नव्हे; ASI चे कोर्टात उत्तर

नवी दिल्ली : दिल्लीतील साकेत न्यायालयाने (Saket Court) कुतुबमिनार (Kutub MInar) प्रकरणावरील सुनावणी पूर्ण झाली असून, यावरील निकाल 9 जून रोजी सुनावणार असल्याचे सांगितले आहे. तसेच संबंधित पक्षकारांना एका आठवड्यात लेखी निवेदन सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान, हिंदू पक्षकारांकडून दाखल याचिकेला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (ASI) विरोध करण्यात आला आहे. कुतुबमिनार परिसरात पूजा करण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे उत्तर देतानाच याचिका फेटाळून लावण्यात यावी, अशी विनंती केली आहे. (Kutub Minar Row News)

हेही वाचा: कुतुब आणि वादांचा ‘मीनार' !

भारतीय पुरातत्व सर्वेक्षणकडून (Archaeological Survey of India) कोर्टात उत्तर दाखल करण्यात आले आहे. यामध्ये कुतुबमिनार हे नॅशनल मोन्युमेंट अॅक्टनुसार संरक्षित स्मारक असल्याचे म्हटले आहे. ते प्रार्थनास्थळ नाही. त्यामुळे येथे कुणालाही पूजा करण्याची परवानगी नाही. पुरातत्व संरक्षण कायदा 1958 नुसार संरक्षित स्मारकात फक्त पर्यटनाला परवानगी आहे. कोणत्याही धर्माची पूजा करण्यास परवानगी नाही. जेव्हा हे कुतुबमिनार परिसर एएसआयच्या संरक्षणाखाली आले, तेव्हाही कोणत्याही धर्माचे लोक तेथे पूजा-अर्चा करत नव्हते असे म्हणत आता कुतुबमिनारच्या दर्जाशी छेडछाड करता येणार नसल्याचे म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

दिल्लीतील कुतुबमिनार परिसरात शेकडो वर्षांपूर्वी कथितपणे पाडण्यात आलेल्या हिंदू आणि जैन मंदिरांच्या जीर्णोद्धाराची मागणी करणाऱ्या याचिकेचा संदर्भ या प्रकरणात आहे. ASI चे माजी प्रादेशिक संचालक धरमवीर शर्मा यांनी कुतुबमिनार हा सूर्याच्या दिशेचा अभ्यास करण्यासाठी कुतुब-अल-दिन ऐबकने नव्हे तर हिंदू सम्राट राजा विक्रमादित्य यांनी बांधला होता, असा दावा केला होता. त्यानंतर कुतुबमिनार वादाला तोंड फुटले. संकुलात हिंदू देवतांच्या मूर्ती सापडल्या होत्या आणि 27 हिंदू-जैन मंदिरे पाडल्यानंतर मिळालेल्या साहित्याने कुव्वत-उल-इस्लाम मशीद बांधण्यात आली होती, असा दावाही करण्यात आला होता.

हेही वाचा: "अमेरिका, युरोपच्या नाकावर टिच्चून..."; फडणवीसांनी केलं मोदींचं कौतुक

हिंदू बाजूचे वकील हरी शंकर जैन यांनी सांगितले की, कुतुबमिनार 27 हिंदू आणि जैन मंदिरे पाडून बांधण्यात आला होता. आजही अनेक हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती येथे आहेत. हे लक्षात घेऊन हिंदूंना कुतुबमिनार संकुलात पूजा करण्याची परवानगी द्यावी. हिंदू बाजूने असाही दावा केला आहे की, 1600 वर्षे जुना लोखंडी खांब आणि पूजेच्या वस्तू अजूनही येथे आहेत. संस्कृतमध्ये घेतलेले श्लोकही या स्तंभावर आहेत. हिंदू पक्षातर्फे अधिवक्ता हरी शंकर जैन आणि अधिवक्ता रंजना अग्निहोत्री यांनी हा दावा दाखल केला आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारले की, तुम्हाला काय वाटते स्मारक की प्रार्थनास्थळ? कोणता कायदेशीर अधिकार तुम्हाला स्मारकाचे पूजास्थळात रूपांतर करण्याचा अधिकार देतो?

Web Title: Qutub Minar Row No Evidence Mosque Was Built On Demolished Structure Says Asi In Court

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top