राफेल विमान खरेदी प्रकरण; राहुल गांधी यांची मुंबई हायकोर्टात याचिका | Narendra Modi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi and narendra modi

राफेल विमान खरेदी प्रकरण; राहुल गांधी यांची मुंबई हायकोर्टात याचिका

मुंबई : राफेल विमान खरेदी (Rafale deal) प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जाहीर टीका केल्यामुळे दाखल झालेला मानहानीचा खटला (Defamation case) रद्दबातल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High court) काँग्रेसचे नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांनी याचिका (petition) केली आहे. सोमवारी यावर सुनावणी होणार आहे.

हेही वाचा: पुरुषांना सीओपीडीचा वाढता धोका; डॉक्टरांचा इशारा

मुंबईमधील गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयात भाजपचे कार्यकर्ते महेश श्रीमल यांनी गांधी यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. या दाव्याची दखल गिरगाव न्यायालयाने घेतली असून गांधी यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई रद्द करण्यासाठी आणि संबंधित खटला रद्दबातल करण्यासाठी गांधी यांनी उच्च न्यायालयात एड कुशल मोर यांच्यामार्फत याचिका केली आहे. यावर आज न्या संदीप शिंदे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. परंतु गांधी यांचे वकिल अन्य न्यायालयात उपस्थित असल्यामुळे या सुनावणी साठी हजर राहू शकले नाही. त्यामुळे यावर सोमवारी ( ता 22) सुनावणी घेण्याचे निश्चित करण्यात आले.

20 सप्टेंबर 2018 रोजी जयपूरमध्ये आयोजित एका सभेत राहुल गांधी यांनी "गली गली मे शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है" असे विधान केले होते.. तसेच 24 सप्टेंबरला एक ट्विट करून गांधीं यानी मोदीं यांना उद्देशून चौकीदार चोर है अशी मानहानीकारक विधाने केली होती. ज्यामुळे भारतीयांची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलीन झाली असा आरोप या तक्रारीतून करण्यात आला आहे. देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीच्याबाबतीत अशी आधारहिन विधान करणे अप्रस्तुत आहे, असा दावा याचिकेत केला आहे. मात्र ही तक्रार करण्याचा अधिकार श्रीमल यांना नाही, आणि गिरगाव न्यायालयाने सुरू केलेली कारवाई अयोग्य आहे असा दावा गांधी यांनी याचिकेत केला आहे.

loading image
go to top