चिनी सीमेजवळ राफेल विमानांच्या घिरट्या; ड्रॅगनला भरणार धडकी

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 21 September 2020

भारताच्या शक्तीशाली राफेल लढाऊ विमानांनी चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळून उड्डान केले आहे.

नवी दिल्ली- भारत आणि चीनमध्ये तणावाची स्थिती आहे. अशात भारताच्या शक्तीशाली राफेल लढाऊ विमानांनी चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळून उड्डान केले आहे. राफेल लढाऊ विमानांना चिनी सीमेजवळ सक्रिय करण्यात आलं आहे. लडाख भागातील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी याठिकाणी राफेल लढाऊ विमानांनी सराव केला असल्याचं सांगितलं जातंय. राफेल विमाने लडाखमध्ये उडत असल्याचा व्हिडिओ 'एएनआय'ने शेअर केला.

CRPF च्या तुकडीवर दहशतवादी हल्ला; पुन्हा पुलवामा घडवण्याचा प्रयत्न

पीपल्स लिबरेशन आर्मीने लडाख जवळच्या भागात रविवारी रात्री युद्धाभ्यास केला आहे. चीनने युद्धाभ्यासादरम्यान तोफा चालवल्या, तसेच जमीनवरुन हवेत मारा करणाऱ्या मिसाईलचे परीक्षणही घेतले. चिनी सैन्याच्या एअर डिफेंस सिस्टिमने शत्रूंच्या लढाऊ विमानांना पाडण्याचाही अभ्यास केला. याच पार्श्वभूमीवर भारताने चीनला लागून असलेल्या सीमा भागात राफेल विमाने उडवून चीनला प्रत्युत्तर दिल्याचं सांगितलं जातंय.

भारताचे शक्तिशाली राफेल लढाऊ विमाने लडाखच्या भागात उड्डाण भरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राफेलच्या वैमानिकांनी अंबाला ते लडाखपर्यंत विमान उडवले होते. सरावासाठी हे उड्डाण करण्यात आले होते. लडाख भागातील वातावरण वेगळे आहे, त्यामुळे तेथील परिस्थितीचा अंदाज यावा यासाठी वैमानिकांना प्रशिक्षण दिले जात आहे. चीनने हल्याचा प्रयत्न केला, तर राफेल वैमानिक यासाठी तयार राहणार आहेत. 

भारताच्या आघाडीमुळे खवळला चीन, तिबेटमध्ये युद्धसराव करत डागली मिसाईल

भारत आणि चीनमध्ये सोमवारी झाली चर्चा

१५ जून रोजी झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनदरम्यान तणाव आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये सोमवारी कमांडर स्तरावर चर्चा पार पडली. कमांडर स्तरावरील ही सहावी चर्चा होती. सूत्रांच्या माहितीनुसार ही चर्चा चीनच्या भागातील मोल्हो येथे झाली. दोन्ही देशांनी झालेल्या बैठकांमध्ये सैन्य मागे घेण्यावर सहमती दर्शवली आहे. मात्र, चीन सैन्य मागे घेण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे.  

दरम्यान,  भारताने गेल्या तीन आठवड्यात ६ टेकड्यांवर ताबा मिळवला आहे. या टेकड्या भारताच्याच हद्दीत आहेत. पण, या टेकड्यांवर भारतीय सैनेने कब्जा केल्यामुळे चिनी सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. चीनच्या दादागिरीला भारत आक्रमकतेने उत्तर देत आहे. त्यामुळे चीन बिथरला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rafale fighter jet operating over a forward airbase in Ladakh near Line of Actual Control with China