प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचे कोरोनामुळे निधन

rahat indori
rahat indori

इंदौर - प्रसिद्ध उर्दू शायर राहत इंदौरी यांचे कोरोनामुळे निधन झाले. ऑरबिंदो हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्याचं ट्विटवरून सांगितलं होतं. त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

सफर की हद है वहाँ तक की, कुछ निशान रहे |
चले चलो की जहाँ तक ये आसमाँ रहे |
- डॉ. राहत इंदौरी (1950-2020)

राहत इंदौरी यांनी मंगळवारी सकाळी ट्विट केलं होतं की, कोरोनाची सुरुवातीची लक्षणं दिसल्यानंतर सोमवारी कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी ऑरबिंदो हॉस्पिटलमध्ये असून लवकरच या आजाराला हरवेन अशी प्रार्थना करा असं म्हटलं होतं.

ट्विटरनंतर आणखी एक विनंती राहत इंदौरी यांनी केली होती. माझ्या तब्येतीची माहिती ट्विटर किंवा फेसबुकवरून देईन. मला किंवा घरी फोन करू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com