

Culinary Legacy: Rahim Nihari Preserves 110 Years of Awadhi Flavors
Sakal
लखनौ : लखनौच्या खाद्यसंस्कृतीचा उल्लेख निघाला की 'कबाब'सोबतच ज्या पदार्थाचे नाव आदराने घेतले जाते, तो म्हणजे 'रहीम कुलचा निहारी'. गेल्या ११० वर्षांपासून अयोध्येच्या नवाबी चवीचा वारसा जपणारा हा पदार्थ केवळ लखनौमध्येच नाही, तर जगभरात प्रसिद्ध आहे.
आज देखील, जुन्या लखनौमधील अकबरी गेट परिसरात 'रहीम कुलचा निहारी' खाण्यासाठी खवय्यांची झुंबड उडालेली पाहायला मिळते.