कपड्यांपर्यंत जावू नका, आम्ही गेलो तर तुम्हाला पश्चाताप होईल; TMCचा भाजपला इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi, Rahul Gandhi, mamata banerjee

कपड्यांपर्यंत जावू नका, आम्ही गेलो तर तुम्हाला पश्चाताप होईल; TMCचा भाजपला इशारा

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेत पक्षाचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी 41 हजारांहून अधिक किमतीचे ब्रिटीश ब्रँड बर्बेरीचे टी-शर्ट परिधान केल्याने वाद सुरू झाला आहे. या मुद्द्यावरून भाजप सातत्याने काँग्रेसला घेरत आहे. त्याचं कारण म्हणजे काही वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींवर लाखोंचा सूट घातल्याचा आरोप करत काँग्रेसने केंद्रातील भाजप सरकारला 'सूट-बूटचे सरकार' म्हटले होते. या वादात आता तृणमूल काँग्रेसने उडी घेतली आहे. (Rahul Gandhi News in Marathi)

आता या संपूर्ण प्रकरणावर विरोधक देखील भाजपवर जोरदार टीका करत आहेत. टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांनी प्रत्युत्तर देत भाजपला मर्यादेत राहण्याची सूचना केली. त्यांनी ट्विट करून भाजपला सल्ला दिला की, विरोधकांच्या वैयक्तिक कपडे आणि सामानावर भाष्य करू नका. लक्षात ठेवा जर आम्ही घड्याळे, पेन, शूज, अंगठ्या आणि कपड्यांवर टिप्पणी करण्यास सुरुवात केली तर तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येईल, असंही मोइत्रा यांनी म्हटलं.

भारत जोडो यात्रेदरम्यान भाजपने राहुल गांधींचा फोटो शेअर केला होता. यासोबतच त्यानी एक स्क्रीनशॉटही शेअर केला, ज्यात राहुलने घातलेल्या टी-शर्टची माहिती दिली आहे. भाजपच्या म्हणण्यानुसार, हा टी-शर्ट 41 हजारांहून अधिक किंमतीचा बर्बेरी ब्रँडचा होता. फोटो शेअर करताना भाजपने कॅप्शनमध्ये लिहीले की, "भारत देखो".

भाजपच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना काँग्रेसने लिहिले, "अरे... भारत जोडो यात्रेसाठी जमलेली गर्दी पाहून घाबरलात का? बेरोजगारी आणि महागाईवर बोला. कपड्यांबद्दल बोलायचे असेल तर मोदीजींच्या 10 लाखांचा सूट आणि दीड लाखांचा चष्मा यावर चर्चा करू. भाजपला त्यावर चर्चा करायची आहे का?"

यापूर्वी, राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर 10 लाख रुपयांचा सूट घातल्याचा आरोप केला होता. तसेच 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी "सूट बूट की सरकार" म्हणत भाजपची खिल्ली उडवली होती. त्यानंतर आता भाजपही अशाच मुद्द्यांवरून काँग्रेसला घेरताना दिसत आहे.

Web Title: Rahul Gandhi 41 Thousand T Shirt Congress Tmc Bjp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..