Rahul Gandhi: नितीश यांचा ‘रिमोट’ मोदींच्या हाती’’: राहुल गांधींची टीका
Rahul Gandhi Modi Criticism: राहुल गांधी यांनी नालंदा सभेत नितीश कुमार यांचा ‘रिमोट’ मोदी-शहा यांच्या हातात असल्याची टीका केली. बिहारच्या विकास, शिक्षण आणि बेरोजगारीवर त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
नालंदा : नितीश यांचा रिमोट आता मोदी आणि शाह यांच्या हातात आहे. बिहारमधील विकास फक्त भाषणांपुरता मर्यादित राहिला आहे, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहार नालंदा येथे आयोजित सभेत गुरुवारी केली.