
Rahul Gandhi
sakal
नवी दिल्ली : लडाखमधील आंदोलनादरम्यान पोलिस गोळीबारात चार आंदोलकांचा बळी गेल्यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वासघाताचा आरोप केला आहे. तसेच या हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी केली जावी, अशी मागणी केली आहे. कारगील युद्धाचे नायक असलेल्या त्सेवांग थरचिनचा मृत्यू सरकारसाठी लाजिरवाणा असल्याची काही केली आहे.