राहुल गांधींचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल; व्हिडिओ मालिकेतील दहा प्रमुख मुद्दे

वृत्तसंस्था
Wednesday, 9 September 2020

कोरोनाव्हायरसच्या तयारीविषयी आणि सध्याची देशाची गंभीर असलेली अर्थव्यवस्था आणि त्यात सुधारणा करण्याच्या उपाययोजनांविषयी त्यांनी सरकारवर ट्विट करत जोरदार टिका केली आहे.

नवी दिल्ली- कोरोनामुळे देशात केलेल्या लॉकडाउनवरुन राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्ला केला आहे.  बुधवारी राहुल गांधींनी एक नवीन व्हिडिओ शेअर केला ज्यामधे अचानक लॉकडाऊन देशाच्या असंघटित घटकांना खूप धोकादायक ठरलं असून ती स्थिती त्यांच्यासाठी मृत्यूदंडासारखे आहे अशी टिका केली आहे. कोरोनाव्हायरसच्या तयारीविषयी आणि सध्याची देशाची गंभीर असलेली अर्थव्यवस्था आणि त्यात सुधारणा करण्याच्या उपाययोजनांविषयी त्यांनी सरकारवर ट्विट करत जोरदार टिका केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 21 दिवसात कोरोना संपवण्याचे आश्वासन दिले होते, परंतु कोट्यावधी रोजगार आणि लघु उद्योग संपविले. मोदीजींचा डिज़ास्टर प्लॅन पाहण्यासाठी हा व्हीडिओ पहा'

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 राहुल गांधीच्या व्हिडिओतील मुख्य मुद्दे- 

1. गरीब लोक दररोज काम करून खातात, त्यांच्यावर हा मोठा आघात आहे.

2. लहान आणि मध्यमवर्गीय व्यवसायाचीही ही वाईट स्थिती आहे

3. 21 दिवसात कोरोनाची लढाई संपेल असं सांगितलं पण या 21 दिवसांत असंघटित क्षेत्रच मोडलं.

4. आम्ही बर्‍याच वेळा गरिबांना मदत करावी, न्याय योजनेसारखी योजना कार्यान्वित करावी, पैसे थेट गरीबांच्या बँक खात्यात जमा करावे लागतील, असं सांगितलं. पण तसं काहीच झालं नाही.

5. पडत्या उद्योगांना मदत करण्याऐवजी मोदी सरकारने श्रीमंत पंधरा- वीस लोकांचा कोट्यावधी रुपयांचा कर माफ केला.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

6. लॉकडाउन हा एक प्रकारचा हल्लाच होता. 

7. लॉकडाउन हा भारतातील उद्योगावर आणि गरिबांवर केलेला हल्ला होता.

8 .लॉकडाउनमुळे बेरोजगारी वाढून तरुणांचे आयुष्य उध्वस्त झाले आहे.

9. लॉकडाउन कामगार, शेतकरी आणि लहान व्यापाऱ्यांवर हल्ला होता. 

10. आता आपण या हल्ल्याविरूद्ध आपण सर्वांनी एकत्र उभे राहिले पाहिजे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi again attacked the Modi government