'लाखो लोकांच्या आयुष्याचं वाटोळं झालं'; राहुल गांधींची PM मोदींवर टीका

rahul gandhi
rahul gandhi

नवी दिल्ली : सध्या देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली असली तरीही परिस्थिती पूर्ववत झालेली नाहीये. शिवाय ती संपूर्णत: हातात देखील आलेली नाहीये. आजही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडतच आहेत. आज देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा एक कोटींच्या पार गेला आहे. भारतात सुमारे आठ महिन्यांपासून कोरोनाचा धुमाकूळ सुरु आहे. 

कोरोनाशी लढाई करण्यासाठी लागू करण्यात आलेला कडक लॉकडाऊन आता टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात  आला आहे. मात्र, यामुळे कोट्यवधी लोकांचा रोजगार गेल्याचे तसेच अर्थव्यवस्था ढासळल्याचे चित्र आहे. यावरुनच आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जहरी टीका केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून ही टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, एक कोटी कोरोना संक्रमण आणि दीड लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पंतप्रधान मोदींनी दावा केला होता की, कोरोनाविरोधातील ही लढाई 21 दिवसांत जिंकू. पण अनियोजित लॉकडाऊनमुळे आपण ही लढाई जिंकू शकलो नाहीयोत. तसेच आपण लाखो लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. 

देशात गेल्या तासात कोरोनाचे 25 हजार 152 नवे रुग्ण आढळले असून यासोबत भारतातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या एक कोटींच्या पुढे गेली आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या एक कोटी 4 हजार 599 इतकी झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात देशात 347 जणांचा मृत्यू झाला. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारी 2020 ला सापडला होता. त्यानंतर आतापर्यंत 325 दिवसात देशातील रुग्णसंख्या एक कोटींवर पोहोचली आहे. भारत जगातील दुसरा असा देश आहे जिथं एक कोटीपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. भारताच्या आधी सर्वाधिक अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com