

Rahul Gandhi Dalit discrimination delhi press conference
esakal
Dalit Discrimination In India : देशात दलितांवर आजही भेदभाव केला जात असल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. “चहाच्या टपरीवरही दलितांसाठी वेगळे कप ठेवले जातात,” असा दावा राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उत्तराखंड दौऱ्यानंतर त्यांच्या भाषणाच्या ठिकाणाचे ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.