कनॉट प्लेसमधील दुकानं भाजपानं जबरदस्तीनं बंद केली; राहुल गांधींचा भाजपवर गंभीर आरोप; रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची 'महारॅली'

Rahul Gandhi accuses BJP of forcibly shutting shops : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. दिल्लीतील प्रसिद्ध कनॉट प्लेस परिसरातील दुकाने भाजपने जबरदस्तीने बंद करायला लावल्याचा दावा त्यांनी केला.
Rahul Gandhi

Rahul Gandhi

esakal

Updated on: 

दिल्लीतील रामलीला मैदानावर INDIA आघाडीच्या महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेच्या विरोधात विरोधकांनी ही रॅली काढली असून, त्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. दिल्लीतील प्रसिद्ध कनॉट प्लेस परिसरातील दुकाने भाजपने जबरदस्तीने बंद करायला लावल्याचा दावा त्यांनी केला. तसेच व्यापाऱ्यांचं नुकसान नेमकं कोण करत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Loading content, please wait...