Rahul Gandhi claims BJP fixed Maharashtra Assembly elections 2024 : २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘फिक्सिंग’ झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. वृत्तपत्रांमध्ये लेख लिहून यासंदर्भातील आरोप त्यांनी केले आहेत. दरम्यान, या आरोपांवर आता निवडणूक आयोगानेही स्पष्टीकरण दिले आहे. आयोगाने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून राहुल गांधी यांनी केलेले आरोप ‘निराधार’ आणि ‘कायद्याचा अपमान’ करणारे असल्याचे म्हटले आहे.