
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला फटका बसला होता होता. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकहाती विजय मिळवला. या विजयानंतर काँग्रेससह विरोधकांनी शंका व्यक्त करताना अनेक आरोप केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. मॅच फिक्सिंगसारखा घोटाळा केल्याचा आरोप राहुल गांधींनी भाजपवर केला आहे. एका वृत्तपत्रात लेखातून राहुल गांधी यांनी हे आरोप केलेत. निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी पाच टप्प्यांचा उल्लेख राहुल गांधी यांनी केला आहे. या आरोपानंतर राहुल गांधींना भाजपने आकड्यांसह उत्तर दिलंय.