
मुझफ्फरपूर : ‘‘नरेंद्र मोदी यांनी मतांची चोरी करत निवडणूक जिंकली. मोदी आणि शहा यांना केंद्रीय निवडणूक आयोग मदत करत आहे,’’ असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज वोटर अधिकार यात्रेनिमित्त आयोजित सभेत केला. व्होटर अधिकार यात्रेचा आज अकरावा दिवस होता आणि जारंग हायस्कूल मैदानात सभा घेण्यात आली.