Rahul Gandhi: राहुल गांधी पुन्हा अडचणीत! आता राहण्यासाठी शोधावं लागणार नवं घर

राहुल गांधींची नुकतीच खासदारकी रद्द करण्यात आली आहे.
Rahul Gandhi News
Rahul Gandhi NewsSakal

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर आता ते पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. कारण लोकसभा सचिवालयानं त्यांना सरकारी बंगला सोडण्याचे आदेश दिले आहेत. सूत्रांच्या हवाल्यानं एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Rahul Gandhi asked to vacate MP Bunglow after disqualification)

खासदारकी रद्द झाल्यानंतर खासदारांना राहण्यासाठीचा बंगलाही त्यांना सोडावा लागू शकतो, अशी चर्चा सुरु होतीच. त्यानुसार, आता त्यांना लोकसभा आवास कमिटीनं हा सरकारी बंगला सोडण्यााची नोटीस दिली आहे. पीटीआयच्या माहितीनुसार, हा बंगला सोडण्यासाठी त्यांना साधारण महिन्याभराचा अवधी देण्यात आला असून २२ एप्रिल २०२३ पर्यंत त्यांना आपला सरकारी बंगला खाली करावा लागणार आहे.

Rahul Gandhi News
BJP Vs Congress: काँग्रेस भाजपविरोधात 'ब्लॅक मॅजिक' करतंय! भाजपचा गंभीर आरोप

राहुल गांधींकडं स्वतःच घर नाही

दरम्यान, राहुल गांधी यांनी यापूर्वी एका जाहीर सभेत आपल्याकडं स्व-मालकीचं घर नसल्याचं सांगितलं होतं. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी जाहीर सभेत सांगितलं होतं की, "आपण आता ५२ वर्षांचे आहोत पण अद्यापही माझ्याकडं घर नाही" त्यामुळं जर दिल्लीत राहुल गांधींकडं स्वतःचं घर नसेल तर आता ते कशा पद्धतीनं आपली व्यवस्था मार्गी लावतील अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

हे ही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

बदनामीच्या फौजदारी प्रकरणात सूरतच्या जिल्हा कोर्टानं राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षाही ठोठावली आहे. त्यामुळं कायद्यानुसार, जर एखाद्या लोकप्रतिनिधीला फौजदारी खटल्यात दोन किंवा त्यापेक्षा जास्त काळाची शिक्षा झाली तर त्याचं पद रद्द आपोआप रद्द होतं. याच नियमानुसार, राहुल गांधींवर लोकसभा सचिवालयानं कारवाई करत नुकतीच त्यांची खासदारकी रद्द केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com