Rahul Gandhi: ‘मोदी-शहांना आम्ही वेडे करून सोडू’; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आरएसएसचे कॉर्पोरेटायझेशन झाले..

Rahul Gandhi Launches Fierce Attack On Modi Shah And RSS: राहुल गांधींचा मोदी-शहांवर थेट निशाणा; आदेश संस्कृतीविरुद्ध अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई, राजीनामा येईपर्यंत सरकारला झोप न देण्याचा इशारा
rahul gandhi

rahul gandhi

sakal

Updated on

नवी दिल्ली : ‘‘देशात सध्या आदेश आणि अभिव्यक्ती असा संघर्ष सुरू आहे. आता काँग्रेस आणि विरोधकांच्या विचारांची अभिव्यक्ती सुरू झाली आहे. ती थांबणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत विरोधक त्यांना शांततेत झोपू देणार नाहीत,’’ अशा शब्दांत काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढविला. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा अदानी आणि अंबानींचा नोकर असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com