

Rahul Gandhi
sakal
नवी दिल्ली : ‘‘जातिनिहाय जनगणनेबाबत सरकारकडे ठोस रूपरेषा आणि कालबद्ध योजनाही नाही. मोदी सरकारची जातिनिहाय जनगणना ही देशातील बहुजनांचा उघड उघड विश्वासघात आहे,’’ असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केला आहे. जनगणनेसंदर्भात लोकसभेमध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नावर सरकारकडून देण्यात आलेल्या उत्तराच्या आधारे राहुल गांधींनी ही टीका केली.