

Rahul Gandhi's 'Chalo Delhi' call to citizens; March to Supreme Court on Monday.
Sakal
नवी दिल्ली : दिल्लीत शांततेने आंदोलन करणाऱ्या तरुणांवर झालेल्या लाठीमारानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (ट्विटर) थेट व्हिडिओ पोस्ट करत केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. "सोमवारी (ता. १२ ऑक्टोबर) संपूर्ण देश सुप्रीम कोर्टावर धडकणार आहे," अशी मोठी घोषणा करत त्यांनी देशवासीयांना #ChaloDilli ची हाक दिली आहे.