Rahul Gandhi Citizenship Row
देश
Rahul Gandhi Citizenship : राहुल गांधी भारताचे नागरिक नाहीत? ज्येष्ठ भाजप नेत्याची हायकोर्टात धाव; काँग्रेसच्या अडचणी वाढणार?
Rahul Gandhi citizenship row latest updates : भाजपचे नेते सुब्रमण्यन स्वामी यांनी राहुल गांधी यांच्या नागरिकतेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. या दरम्यान आता भाजपचे नेते सुब्रमण्यन स्वामी यांनी राहुल गांधी यांच्या नागरिकतेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. स्वामी यांनी मागील आढवड्यात आरोप केला होता की राहुल गांधी यांच्याकडे ब्रिटनची नागरिकता आहे. आता स्वामी यांनी थेट न्यायालयाचे दार ठोठावले असून केंद्र सरकारला या प्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. यासोबतच स्वामी यांनी केंद्राकडून माझ्या तक्रारीवर स्टेटस रिपोर्ट मागितला जावा अशी मागणी देखील कोर्टात केली आहे.

