

Brazilian Model Larissa Reacts
esakal
हरियाणा विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतचोरी झाल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांनी बुधवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी हरियाणातील मतदार यादीत ब्राझिलियन मॉडेल लारिसाचा फोटो २२ वेळा वापरल्याचा पुरावा सादर केला. या फोटोखाली 'स्वीटी', 'सीमा', 'सरस्वती' अशी वेगवेगळी नावे लावून २२ वेळा मतदान झाल्याचा दावा त्यांनी केला. यावर आता लारिसाने स्वतः प्रतिक्रिया दिली असून, तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.