फोटोसाठी राहुल गांधींनी सहकाऱ्याचा फाडला शर्ट; भाजपचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

congress

फोटोसाठी राहुल गांधींनी सहकाऱ्याचा फाडला शर्ट; भाजपचा आरोप

देशात वाढत्या महागाई वरूण कॉंग्रेस देशभर आंदोलने करत आहे. शुक्रवारी दिल्लीत झालेल्या कॉंग्रेस नेत्यांनी महागाई, बेरोजगारी,आणि जीसटी च्या विरोधात काळे कपडे घालून निदर्शने केली, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. यादरम्यान राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी प्रचंड गदारोळ केल्यानंतर ताब्यात घेतले. ज्यानंतर राहुलन गांधी यांनी आरोप केली की आंदोलनातील सहभागी लोकांना पोलिसांनी मारहान केली.

या नंतर आता बीजेपी ने राहुल आणि प्रियंका गांधी यांच्या वर 'तमाशेचे राजकारण' करत असल्याचा आरोप केला आहे. वास्तविक, भाजप आयटी विंगचे प्रभारी अमित मालवीय यांनी एक फोटो ट्विट केला आहे, त्यात काँग्रेस नेते दीपेंद्र एस हुड्डा आणि राहुल गांधी पोलिसांन सोबत ते भिडताना दिसतात. अमित मालवीया यांनी फोटोसोबत लिहिले की, "राहुल गांधींनी त्यांचे सहकारी दीपेंद्र हुड्डा यांचा शर्ट फाडला, कारण आंदोलनाचा एक चांगला फोटो मिळेल आणि दिल्ली पोलिसांना दोषी ठरवता येईल.

याच्या आधी मालवीया यांनी आरोप केला होता, कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी पार्टी मुख्यालयाच्या बाहेर आंदोलनात सहभागी झाल्या होत्या,आणि त्यांनी ड्युटीवर असणाऱ्या महिला पोलिसाचा हात पिरगळला आणि त्यांनी तिला लाथ पण मारली. या घटनेच्या एका व्हिडिओमध्ये दिल्ली पोलीस विजय चौकात आंदोलनादरम्यान काँग्रेस खासदार दीपेंद्र हुडा यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना दिसत होते.

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाहा यांनी आरोप केला की कॉंग्रेस 'तुष्टिकरणाचे' राजकारण करत आहे. ते म्हणाले की काँग्रेसने 5 ऑगस्टला काळे कपडे घालून निषेध केला, कारण 2020 मध्ये याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राम मंदिराची पायाभरणी केली होती. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी काळ्या रंगाची कपडे घालून निदर्शने केली.

Web Title: Rahul Gandhi Colleague Shirt Photo Bjp Allegation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..