
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप करतानाच भाजपने त्यांचे वादग्रस्त पोस्टर जारी केले आहे. या पोस्टरमध्ये अर्धा चेहरा राहुल गांधी यांचा असून अर्धा चेहरा पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिफ मुनीर यांचा आहे. पाकिस्तानसोबत लढत असताना भारताची किती विमाने पडली? असे गांधी वारंवार विचारत आहेत. विशेष म्हणजे भारताने पाकची किती विमाने पाडली अथवा हॅंगरमध्ये उभी असलेली किती विमाने उध्वस्त केली, हा प्रश्न गांधी यांना पडत नाही. खरे तर गांधी हे ''निशान ए पाकिस्तान'' आहेत, अशी टीका भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी केली.