"बलवानांसमोर मान खाली घाला ही..." ; सावरकरांच्या मुद्द्यांवरून राहुल गांधींची भाजपवर टीका - Rahul Gandhi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

Rahul Gandhi : "बलवानांसमोर मान खाली घाला ही..." ; सावरकरांच्या मुद्द्यांवरून राहुल गांधींची भाजपवर टीका

Congress Plenary Session 2023 : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये काँग्रेसचं 85 वं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा आज (रविवार) शेवटचा दिवस आहे. आज राहुल गांधी चांगलेच आक्रमक दिसले. भारत जोडो यात्रेतील अनुभव त्यांनी सांगितले. नंतर काश्मिरींनी तिरंगा फडकवल्याचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. 

बलवानांसमोर मान खाली घाला ही सावरकरांची विचारधारा आहे आणि ही विचारधारा भाजप पुढे घेऊन जात असल्याचे राहुल गांधी म्हणाले. जो कमजोर आहे त्याला मारा आणि जो बलवान आहे त्याच्यासमोर झुका हीच का तुमची देशभक्ती, असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. 

राहुल गांधी म्हणाले, "सावरकरांची विचारधारा म्हणजे तुमच्यापेक्षा बलवान असलेल्यासमोर मान खाली घाला, भारताचे मंत्री चीनला सांगत आहेत की, तुमची अर्थव्यवस्था आमच्यापेक्षा मोठी आहे, त्यामुळे आम्ही तुमच्यासमोर उभे राहू शकत नाही. देशभक्ती कशाला म्हणतात? कोणती देशभक्ती? हे आहे का?"

यापूर्वी देखील राहुल गांधी यांनी विर सावरकरांवर टीका केली होती. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात पोहोचल्यावर राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्यावर इंग्रजांना मदत केल्याचा आरोप केला होता. तुरुंगात असताना ब्रिटीशांच्या भीतीने माफीनाम्यावर स्वाक्षरी करून सावरकरांनी महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे स्वातंत्र्यसेनानी यांचा विश्वासघात केल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. पत्रकार परिषदेत त्यांनी 'सावरकरांचे पत्र'ही दाखवले होते. राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर चांगलाच गदारोळ झाला होता.