
नवी दिल्ली : ‘मेक इन इंडिया’ ही चांगली संकल्पना असूनही ती पूर्णपणे अपयशी ठरली ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य करायला हवी, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ‘‘२०१४ मध्ये ‘जीडीपी’मध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा १५.३ टक्के होता. तो २०२५ मध्ये १२.६ टक्क्यांवर आला.