

Rahul Gandhi
esakal
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी यूपीआय व्यवहारांवर कर आकारण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. या मुद्द्यावर भाष्य करताना त्यांनी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा संदर्भ दिलाय. पंतप्रधान मोदींनी यूपीआयवर लावलेला कर तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.