Rahul Gandhi : राहुल यांना बोलण्याची संधी नाही; बिर्लांकडे तक्रार

Lok Sabha : विरोधी पक्षनेते राहुल गांधींना लोकसभेत बोलण्याची संधी नाकारल्याबद्दल इंडिया आघाडीतील नेत्यांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्लांकडे तक्रार केली. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर राजकीय हेतूने हा निर्णय घेतल्याचा आरोप केला.
Rahul Gandhi
Rahul Gandhi sakal
Updated on

नवी दिल्ली : सभागृहातील वर्तनावरून लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल विरोधी पक्षनेते राहुल गांधींना समज दिल्याच्या घटनेचे पडसाद आजही उमटले. विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांच्या लोकसभेतील गटनेत्यांच्या शिष्टमंडळाने आज लोकसभाध्यक्षांची भेट घेऊन विरोधी पक्षनेत्यांना बोलण्याची संधी नाकारल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच या प्रकारावर सत्ताधाऱ्यांकडून राजकारण केले जात असल्याचा तक्रारीचा सूरही विरोधकांनी लावला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com