'कोरोना रोको, जनता के सवाल नहीं'

'कोरोना रोको, जनता के सवाल नहीं'

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. (Corona) अशा परिस्थितीत कोरोनाची स्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपुरं पडत असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येतो आहे. कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार लोकांचे प्रश्न नको झाले आहेत. सरकार त्यांना अटक करुन त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. (Rahul Gandhi) यासंदर्भात याआधी राहुल गांधी यांनी 'मला अटक करुन दाखवा' असं ओपन चँलेज देखील केंद्र सरकारला (Modi Government) दिलं होतं. आणि आता राहुल गांधी यांनी सरकारवर नवीन टीका केली आहे. (Rahul Gandhi dig at PM Modi saying Stop corona not people questions)

'कोरोना रोको, जनता के सवाल नहीं'
हरयाणात झुंडबळी, औषध आणायला गेलेल्या तरुणाची हत्या

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, 'मोदी सिस्टीम'मध्ये जितक्या सहजतेने प्रश्न विचारणाऱ्या लोकांना अटक होते, तितक्याच सहजतेने जर देशात लस मिळत असती तर आज देश या वेदनादायक स्थितीमध्ये नसता, असा शालजोडीतला टोला त्यांनी हाणला आहे. पुढे त्यांनी म्हटलंय की, कोरोनाला थांबवा, लोकांचे प्रश्न थांबवू नका, असा सल्ला देखील दिला आहे.

'कोरोना रोको, जनता के सवाल नहीं'
सिंगापूरमधील स्ट्रेनमुळे केजरीवाल चिंतेत; केंद्राला केलं आवाहन

दिल्लीमध्ये 'मोदी जी, आपच्या मुलांच्या लशी परदेशी का पाठवल्या?' असा प्रश्न विचारणारे पोस्टर लावण्यात आले होते. मोदी सरकारवर टीका करणारे हे पोस्टर लावल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शनिवारी 25 जणांना अटक केली होती. पोस्टरमध्ये कोरोना लशींच्या पुरवठ्याबाबत प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं होतं की,'मलाही अटक करा! आता तर या पोस्टरचेच चित्र त्यांनी आपल्या ट्विटरवरील प्रोफाईल पिक्चरला लावले आहे आणि मोदींना विचारलेला तोच प्रश्न कायम ठेवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आता टीका करणारे हे दुसरे ट्विट केलं आहे.

देशात कोरोनाचा कहर सुरु असताना केंद्र सरकारने विदेशांना लशीचा पुरवठा केला होता. या संदर्भात दिल्लीतील काही लोकांनी पोस्टरबाजी करत केंद्र सरकारवर टीका केली होती. आमच्या लहान मुलांची कोरोना प्रतिबंधक लस विदेशात का पाठवली, अशा मजकुराखाली पोस्टर लावण्यात आले होते. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केले आणि 25 जणांना अटक केली होती. राहुल गांधींनी यांना पाठिंबा देत तोच सवाल कायम ठेवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com