हरयाणात झुंडबळी, औषध आणायला गेलेल्या तरुणाची हत्या

हरयाणात झुंडबळी, औषध आणायला गेलेल्या तरुणाची हत्या
Summary

आसिफ औषधं आणण्यासाठी सोहना इथं जात असताना ही घटना घडल्याचं म्हटलं जात आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

गुरुग्राम - हरयाणातील (Haryana) मेवात भागात मॉब लिंचिंगची (Mob Lynch) घटना घडल्याचं समोर आलं आहे. मेवातच्या रोजका मेव पोलिस ठाण्याच्या हद्दीत 25 वर्षीय आसिफ खान (Asif Khan) याला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. तसंच आसिफचे दोन भाऊसुद्धा गंभीर जखमी झाले आहेत. आसिफ औषधं आणण्यासाठी सोहना इथं जात असताना ही घटना घडल्याचं म्हटलं जात आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आसिफच्या कुटुंबासह गावकऱ्यांनी आता आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण तयार झालं आहे.

जिम ट्रेनर असलेल्या आसिफ त्याच्या दोन्ही भावांसह औषध आणण्यासाठी 16 मे रोजी रात्री सोहना इथं निघाला होता. गाडीवरून परत येत असताना रात्री 9 च्या सुमारास दोन एसयुव्ही गाड्यांमधून आलेल्या लोकांनी आसिफ आणि त्याच्या भावांना घेरलं. त्यांच्या दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर काठीने तिघांवर हल्ला करण्यात आला. यामध्ये आसिफचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले.

हरयाणात झुंडबळी, औषध आणायला गेलेल्या तरुणाची हत्या
प्लाझ्मा थेरपीला कोरोनावरील उपचारातून वगळलं

आसिफच्या कुटुंबाने हा मॉब लिंचिंगचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मुलाला गोळी मारण्यात आल्याचा दावाही केला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे गावासह परिसरात तणाव निर्माण झाला आहे. गावकऱ्यांनी आसिफला न्याय मिळावा या मागणीसाठी रास्ता रोको केला आहे. पोलिसांनी रस्त्यावर जमलेल्या नागरिकांना हटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यावर दगडफेकीचा प्रकारही घडला. या प्रकरणी आसिफचे वडील झाकीर हुसेन यांनी तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. आसिफच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, यामध्ये संदीप, अडवानी, भीम, ऋषी, सोनी, कोटा, अनूप, बल्ला, नथू, महेंद्र, कुलदीप, राजू, काला यांच्यासह इतरांचा समावेश आहे. यातील सहा जणांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com