राहुल गांधींच्या कथित बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाला नवे वळण; सुप्रीम कोर्टाने घेतला मोठा निर्णय, हायकोर्टाचा 'तो' आदेशही केला रद्द

Rahul Gandhi Case : राहुल गांधी यांच्याविरोधात कर्नाटकातील भाजप कार्यकर्ता एस. विघ्नेश शिशिर यांनी याचिका दाखल केली होती. राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमा केल्याचा दावा त्यांनी केला होता.
Rahul Gandhi

Rahul Gandhi

esakal

Updated on: 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधातील कथित बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाचे आधीचे आदेश रद्द करत संपूर्ण प्रकरण पुन्हा सुनावणीसाठी पाठवले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे. बुधवारी (२५ नोव्हेंबर) झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने हा महत्त्वाचा निर्णय दिला.

Loading content, please wait...