Diwali festival : भारतात एक राज्य असंही जिथं आजही बहुतांश लोक दिवाळीच करत नाहीत साजरी, कारण...

Non-celebration of Diwali : जाणून घ्या, मग दिवाळीच्या दिवशी तेथील लोक नेमकं काय करतात आणि कोणतही आहे ते राज्य?
People in Kerala celebrating traditional festivals like Onam while Diwali remains less prominent across the state.

People in Kerala celebrating traditional festivals like Onam while Diwali remains less prominent across the state.

esakal

Updated on

Why Diwali Is Not Widely Celebrated in Kerala: देशभर दिवाळीचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा होतो आहे. दिवाळीमुळे संपूर्ण देशच दिव्यांनी झगमगून जातो. सर्वोच्च न्यायालयाने यंदा ग्रीन फटाक्यांना परवानगी दिली आहे. यामुळे दिल्ली-एनसीआरमधील लोकांनाही दिलासा मिळाला आहे. मात्र भारतात एक राज्य असंही आहे जिथे दिवाळीचा उत्सव जवळपास होतच नाही आणि ते राज्य आहे केरळ, दिवाळी ही अतिशय मर्यादित स्वरूपात म्हणजे जवळपास साजरी होत नाही, असंही म्हटलं तरी एकवेळ चालेल.

केरळ आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवासाठी प्रसिद्ध आहे. मात्र या राज्यातील लोकांचा दिवाळीबाबतचा दृष्टिकोन वेगळा आहे. येथील बहुतांश हिंदू कुटुंब दिवाळी धूमधडक्यात साजरी करत नाहीत. याचे सर्वात मोठे कारण आहे स्थानिक मान्यता आणि परंपरा.

असे मानले जाते की केरळचे राजे महाबली यांचा मृत्यू दिवाळीच्या दिवशी झाला होता. यामुळेच केरळमध्ये बहुतांश लोक दिवाळीच्या दिवशी उत्सव साजरा न करता भक्तिभाव आणि शांतता बाळगतात. हे लोक या दिवशी दिवा लावून पूजा करतात, मात्र कोणताही गाजावाजा करत नाही किंवा फटाकेही फोडत नाहीत.

People in Kerala celebrating traditional festivals like Onam while Diwali remains less prominent across the state.
Rasgulla purity test : पांढराशुभ्र दिसणारा रसगुल्ला शुद्ध की भेसळयुक्त चटकन कसं ओळखाल?

तरी काहीजण असाही युक्तिवाद करतात की, केरळमध्ये पावसाळा हा दिवाळीच्या आसपास सुरू असतो, ज्यामुळे दिवे आणि फटाके पेटवणे सहज शक्य होत नाही. खरंतर हे केवळ एक सांगण्यापुरतं कारण आहे, कारण या राज्यात ओणम हा सण अतिशय उत्साहात आणि धुमधकडाक्यात साजरा केला जातो, जो महाबलींशी निगडीत असतो. यामुळेच येथे धार्मिक मान्यतांचा प्रभाव अधिक असल्याचे मानले जाते.

People in Kerala celebrating traditional festivals like Onam while Diwali remains less prominent across the state.
Electric car caught fire Video : भररस्त्यात पेटली इलेक्ट्रिक SUV कार; दरवाजे झाले लॉक अन् ड्रायव्हर जिवंत जळाला!

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे केरळमध्ये हिंदू लोकसंख्या जवळपास ५५ टक्के आहे. यामुळे खरंतर तिथे दिवाळी साजरी होण्यास काहीही अडचण नसली पाहीजे. परंतु तेथील स्थानिक मान्यता आणि परंपरागत गोष्टींनी तेथील सणांची दिशा बदलल्याचे दिसून येते. तरी आता तेथील काही शहरं जसं की कोच्ची, तिरुवंतपुरम येथे आता अन्य राज्यांप्रमाणे दिवाळीची थोडीफार झलक दिसून येते. मात्र ग्रामीण भागात दिवळीचा दिवस नेहमीसारखाच अतिशय साधा असतो.

People in Kerala celebrating traditional festivals like Onam while Diwali remains less prominent across the state.
Government Employees PF : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पीएफ व्याजदरांबाबत नवीन अपडेट ; अर्थ मंत्रालयाकडून अधिसचूना जारी!

तामिळनाडूत छोट्या दिवाळीला महत्त्व -

केरळच नाहीतर तामिळनाडूमधील काही भागांमध्येही दिवाळीचे पारंपारिक स्वरूप वेगळे आहे. त्या ठिकाणी लोक नरकचतुर्दशीला महत्त्व देतात. पारंपारिक कथेनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. यामुळे तामिळनाडूत हा दिवस छोटी दिवाळी म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com