
नवी दिल्ली : ‘‘निवडणूक आयोग भाजपसाठी मतांची चोरी करीत आहे. याबाबत माझ्याकडे जे पुरावे आहेत, ते अणुबॉम्बसारखे आहेत. हा बॉम्ब फुटल्यानंतर आयोगाला लपण्यासाठी जागा मिळणार नाही. निवडणूक आयोगातील लोक देशाविरोधात काम करत आहेत. ते सेवानिवृत्त होवोत अथवा अन्यत्र कुठेही जावोत. त्यांना सोडले जाणार नाही,’’ असा इशारा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिला.