
Rahul Gandhi ED: महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेट्टा डिसोझा पोलिसांवर थुंकल्या
नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची चौकशी चालू आहे. यामुळे काँग्रेसकडून देशभरात जोरदार निदर्शने चालू आहेत. ईडीविरोधात केले जात असलेल्या निदर्शनावेळी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेट्टा डिसोझा (Netta D'Souza) या पोलीस कर्मचाऱ्यांवर थुंकल्या आहेत. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्तेही उपस्थित होते.
(Netta D'Souza Spits on Police)
सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यांच्यावर नॅशनल हेराल्ड प्रकरणात आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. देशभर काँग्रेसकडून आंदोलने आणि निदर्शने केले जात आहेत. तर पोलिसांकडून त्यांना रोखण्यात येत आहे. या आंदोलनात काँग्रेसचे नेतेही उपस्थित आहेत. दरम्यान यावेळी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेट्टा डिसोझा या पोलीस कर्मचाऱ्यांवर थुंकल्या आहेत.
दरम्यान राहुल गांधी यांची मनी लॉन्डरिंग प्रकरणात चौकशी सुरू आहे. त्यांची ईडीकडून पाच दिवसात तब्बल ५० तास चौकशी करण्यात आली आहे. आज त्यांच्या चौकशीचा पाचवा दिवस असून ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले आहेत.
राहुल गांधी यांची ईडीने मागच्या आठवड्यात सोमवार, मंगळवार आणि बुधवारी चौकशी केली होती. यावेळी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) त्यांचे जबाब नोंदवण्यात आले होते. शुक्रवारी ते पुन्हा तपास यंत्रणेसमोर हजर होणार होते. परंतु, आई सोनिया गांधी यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या चौकशीतून वगळण्यासाठी ईडीच्या तपास अधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते. ईडीने त्याची विनंती मान्य करून सोमवारी हजर राहण्यास सांगितले होते. त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली आहे.
Web Title: Rahul Gandhi Ed Raid Netta Dsouza Spits On Police
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..