In Bengaluru rally, Rahul Gandhi alleges BJP stole votes in Karnataka and Maharashtra : राहुल गांधी यांनी काल निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. भाजपाच्या मदतीसाठी निवडणूक आयोग मतांची चोरी करत असल्याचं ते म्हणाले. त्यांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. महत्त्वाचे म्हणजे राहुल गांधी यांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगानेही त्यांना शपथपत्र पाठवली आहेत. या शपथपत्रावर सही करा, अन्यथा देशाची माफी मागा, असं आयोगाने म्हटलं आहे. आयोगाच्या या भूमिकेनंतर राहुल गांधी चांगलेच संतापले.