Rahul Gandhi refuses to sign: ‘’माझा डेटा थोडीच आहे, मी स्वाक्षरी करायला’’ ; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं!

Rahul Gandhi on Election Commission Data : ही लढाई राजकीय नाही, तर संविधान वाचवण्याची आहे. ही लढाई एक व्यक्ती, एक मत यासाठी आहे. असंही राहुल गांधींनी म्हटलंय
Rahul Gandhi addresses media, firmly stating he will not sign, citing the Election Commission’s own data as evidence.
Rahul Gandhi addresses media, firmly stating he will not sign, citing the Election Commission’s own data as evidence. esakal
Updated on

Rahul Gandhi’s Bold Statement on Election Commission Data: विरोधी पक्षाच्या खासदारांनी सोमवारी बिहारमधील मतदार यादीतील दुरूती आणि मत चोरीच्या आरोपांविरुद्ध संसदेपासून ते निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढला, मात्र पोलिसांनी त्यांना मध्येच रोखले आणि सर्वांना ताब्यात घेतले. या मोर्चात विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेकविरोधी पक्षांचे खासदार उपस्थित होते.

मोर्चादरम्यान, माध्यमांनी राहुल गांधींना विचारले की निवडणूक आयोगाने तुम्हाला नोटीसला उत्तर देण्यास सांगितले आहे आणि तुम्ही उत्तर देत नाही आहात. यावर राहुल गांधींनी उत्तर दिले की, 'तो त्यांचाच डेटा आहे, त्यांनी आपल्या वेबसाइटवरून काढून घ्यावा. माझा डेटा थोडीच आहे, मी स्वाक्षरी करायला.. त्यांचा डेटा आहे. तुम्ही उचला तुमचा डेटा, आम्ही तुम्हालाच दिलेला आहे. तुम्ही त्याला आपल्या वेबसाइटवर टाका, तुम्हाला समजेल. म्हणजे हे केवळ लक्ष विचलित करण्याचं काम आहे आणि आणखी एक गोष्ट म्हणजे, हे फक्त बंगळुरूमध्येच नाही, तर देशातील विविध मतदारसंघांमध्ये घडले आहे. निवडणूक आयोगाला माहीत आहे की त्यांचा डेटा फुटेल होईल, म्हणून तो नियंत्रित करण्याचे आणि लपवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.'

खरं तर, कर्नाटकच्या मतदार यादीतील गोंधळाच्या राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने कडक भूमिका घेतली आहे. आयोगाने राहुल गांधी यांना पत्र लिहून मतदारांच्या नावांमध्ये, पत्त्यांमध्ये आणि ओळखींमध्ये फसवणुकीच्या आरोपांचे पुरावे सादर करण्यास आणि प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यास सांगितले आहे. जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे आणि जनतेची दिशाभूल करणे थांबवावे, असंही निवडणूक आयागाने म्हटलेलं आहे.

Rahul Gandhi addresses media, firmly stating he will not sign, citing the Election Commission’s own data as evidence.
Uddhav Thackeray Press: ''भ्रष्टाचारी मंत्र्यांबाबत मुख्यमंत्री, राज्यपालांना पुरावे दिले, तरीही कुणी..'' ; उद्धव ठाकरेंचं विधान!

 तर राहुल गांधींनीही हे स्पष्ट केलंय की, ही लढाई राजकीय नाही, तर संविधान वाचवण्याची आहे. ही लढाई एक व्यक्ती, एक मत यासाठी आहे आणि आम्हाला स्वच्छ मतदारयादी हवी आहे. तसेच त्यांनी आरोप केला की, कर्नाटकाती एका विधानसभा मतदारसंघात त्यांच्या पक्षाच्या संशोधनात एक लाखांहून अधिक बनावट मत आढळली आणि निवडणूक आयोग हे सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहे.

Rahul Gandhi addresses media, firmly stating he will not sign, citing the Election Commission’s own data as evidence.
Supreme Court on Pigeon Feeding: कबुतरांना दाणे टाकाणाऱ्यांविरोधात दाखल होणार FIR ; सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निर्णय ठेवला कायम!

इंडिया आघाडीचा मोर्चा सुरू झाल्यानंतर संसद मार्गावरील पीटीआय इमारतीजवळ बॅरिकेड्स लावून पोलिसांनी रस्ता अडवला. यानंतर अनेक खासदार रस्त्यावर बसून घोषणाबाजी करू लागले. तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा, काँग्रेसच्या संजना जाटव आणि जोठिमणी यांच्यासह काही महिला खासदार बॅरिकेड्सवर चढून निवडणूक आयोगाविरुद्ध घोषणाबाजी करू लागल्या. पोलिसांनी सर्वांना बसमध्ये बसवून संसद मार्ग पोलिस ठाण्यात नेले, जिथे नंतर त्यांना सोडण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com