Rahul Gandhi : पंतप्रधान झालो तर 'हे' तीन कामं करणार; राहुल गांधींनी दिलं स्पष्टीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi bharat jodo yatra

Rahul Gandhi : पंतप्रधान झालो तर 'हे' तीन कामं करणार; राहुल गांधींनी दिलं स्पष्टीकरण

नवी दिल्लीः भारत जोडो यात्रेच्या अनुषंगाने राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना पत्रकारांनी पंतप्रधान झालात तर काय कराल? असा प्रश्न विचारला. त्यावर राहुल गांधी यांनी तीन कामं करणार असल्याचं नमूद केलं.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे देशभरात काँग्रेसच्या बाजूने वातावरण तयार होत असल्याचं दिसून येत आहे. जाहीर सभा, पत्रकार परिषदा आणि थेट संवाद; या माध्यमातून राहुल जनतेशी जोडले जात आहेत.

आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींना पत्रकाराने पंतप्रधान झालात तर पहिल्यांदा काय कराल, असं विचारलं. त्यावर राहुल गांधींनी गांभीर्याने उत्तर दिलं आहे.

१. मुलांना व्हिजन देणार

राहुल गांधी म्हणाले की, सुरुवातीला देशातच्या शैक्षणिक धोरणार काम करायला आवडेल. आमची शिक्षण यंत्रणा योग्य रितीने काम करत नाही. त्यामुळे मुलांना व्हिजन मिळत नाहीये, हे मला भारत जोडो यात्रेतून निदर्शनास आलं आहे.

२. गुणवत्तेलाच संधी देणार

गुणवत्तेला वाव देणं गरजेचं आहे. गुणवत्ता नसलेल्यांना संधी देणं चुकीचं आहे. ज्यांच्याजवळ गुणवत्ता आहे, त्यांना मदत करणं आवश्यक आहे. सध्या देशात स्किल संपवण्याचे प्रकार घडत असल्याचं राहुल गांधी म्हणाले.

३.दिशाभूल करणारं परराष्ट्र धोरण

राहुल गांधी म्हणाले की, देशात बंधूता, एकता आणि प्रेमभाव अबाधित राखणं गरजेचं आहे. कारण त्याचा परिणाम देशाच्या सीमांवरही होतो. दुसरे देश देशातली हिंसा बघून फायदा घेतात. ते बदलणं गरजेचं आहे.