Congress Vs BJP: लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यांनी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अहमदाबाद येथे काँग्रेस कार्यकर्थ्यांना संबोधित केलं. ते म्हणाले की, मागच्या ३० वर्षांपासून गुजरातमध्ये काँग्रेस सत्तेपासून दूर आहे. परंतु आता परिवर्तन करावं लागले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने पुढची लढाई लढण्याचा सल्ला राहुल गांधींनी दिला.