राहुल गांधी खोटारडे नेते - जावडेकर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 डिसेंबर 2019

राष्ट्रीय लोकसंख्या नोंद वही (एनपीआर) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिका (एनआरसी) म्हणजे गरिबांवर कराचा बोजा असल्याची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केल्यानंतर भाजपने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी हे २०१९ चे सर्वात खोटारडे नेते असून, कर आणि भ्रष्टाचार काँग्रेसची संस्कृती आहे, अशी तोफ केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज डागली.

नवी दिल्ली - राष्ट्रीय लोकसंख्या नोंद वही (एनपीआर) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिका (एनआरसी) म्हणजे गरिबांवर कराचा बोजा असल्याची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केल्यानंतर भाजपने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी हे २०१९ चे सर्वात खोटारडे नेते असून, कर आणि भ्रष्टाचार काँग्रेसची संस्कृती आहे, अशी तोफ केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज डागली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भ्रष्टाचाराला चाप लावणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा काँग्रेसकडून विरोध होतो, असा टोला जावडेकर यांनी भाजप मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत लगावला.

‘एनपीआर’ला राहुल गांधी कर (टॅक्‍स) म्हणत आहेत, मात्र काँग्रेसची संस्कृतीच टॅक्‍सची असून जयंती टॅक्‍स, कोळसा टॅक्‍स, टू जी टॅक्‍स, जीजाजी टॅक्‍स ही त्यांची उदाहरणे असल्याची कोपरखळी जावडेकर यांनी मारली. आसाममध्ये मतपेढीच्या राजकारणासाठी काँग्रेसने घुसखोरीला प्रोत्साहन दिले. घुसखोर काँग्रेसचे मतदार बनतील या राजकीय फायद्यासाठीच काँग्रेसकडून ‘एनपीआर’ला विरोध होत आहे, असा आरोपही जावडेकर यांनी केला. राहुल गांधींचा उल्लेख २०१९ मधील सर्वाधिक खोटारडा नेता असा करून जावडेकर म्हणाले, की काँग्रेसने आता तरी खोटे बोलणे आणि देशाची दिशाभूल करणे बंद करावे. 

ओळख पटविणारी व्यवस्था
‘एनपीआर’ ही गरिबांची ओळख पटविणारी व्यवस्था असून २०१० मध्ये अस्तित्वात आलेल्या ‘एनपीआर’च्या तपशिलांच्या आधारेच कल्याणकारी योजनांसाठी राज्यांमध्ये लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. तशाच प्रकारची निवड आता २०२० मध्येही केली जाईल, असे सांगून प्रकाश जावडेकर म्हणाले, की ‘आधार’मुळे थेट रक्कम हस्तांतरण योजना सुरू झाली. आणि तब्बल नऊ लाख कोटी रुपये लाभार्थ्यांच्या थेट बॅंक खात्यांमध्ये जमा करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi is a false leader prakash jawadekar