

rahul gandhi
esakal
INDIA bloc protest: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांचे आंदोलन सुरूच असून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका वक्तव्याने या आंदोलनातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. आपल्याविरोधात आधीच ४५ गुन्हे दाखल असून आपण अशा कारवायांना मुळीच घाबरत नसल्याचे राहुल गांधींनी स्पष्ट केले आहे.