Video : राहुल गांधीचे घेतले चुंबन...

वृत्तसंस्था
Wednesday, 28 August 2019

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना आपल्या वायनाड मतदारसंघातील दौऱयादरम्यान एका अनपेक्षित प्रसंगाला सामोरे जावे लागले.

वायनाड (केरळ) : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना आज (बुधवार) आपल्या वायनाड मतदारसंघातील दौऱयादरम्यान एका अनपेक्षित प्रसंगाला सामोरे जावे लागले. एका अतिउत्साही कार्यकर्त्याने त्यांचे चुंबन घेतलं. या प्रकाराने राहुल गांधीही चकित झाले असून, संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

राहुल गांधी हे मोटारीच्या पुढील सीटवर बसलेले असताना नागरिकांशी हात मिळवत होते. त्या वेळी एका चाहत्याने त्यांच्याशी हात मिळवला व कळायच्या आत त्यांच्या गालाचे चुंबन घेतले. या प्रसंगामुळे राहुल गांधीही काहीसे गोंधळले. यानंतर एकाने चुंबन घेणाऱ्याला मागे ओढले. राहुल गांधी त्यानंतरही नागरिकांशी मिळवत अभिवादन करत राहिले.

राहुल गांधी हे चार दिवसांसाठी केरळ दौऱ्यावर असून, ते पूरग्रस्तांची भेट घेत आहेत. वायनाड हा केरळमधील पावसाचा सर्वाधिक फटका बसलेला जिल्हा आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांचे चुंबन घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेन्टाईन्स डे च्या दिवशी गुजरातमधील एका महिलेने त्यांच्या गालाचे चुंबन घेतले होते. 2014 मध्ये पश्चिम बंगालमधील एका मिठाईच्या दुकानातही प्रचारादरम्यान एका पुरुषाने त्यांचे चुंबन घेतले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi gets a surprise kissed in wayanad at kerala