
पाटणा, ता. २ (पीटीआय) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील एका युवकाला नवी मोटारसायकल भेट दिली. शुभम सौरभ असे या युवकाचे नाव असून, ‘व्होटर अधिकार यात्रे’दरम्यान त्याची दुचाकी हरवली होती. काँग्रेस पक्षाच्या ‘एक्स’वरील हँडलवरून याबाबतचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.