Gig Workers : गिग कामगार देशाच्या प्रगतीतील भागीदार; राहुल गांधींकडून कामगारांच्या हक्कांचा मुद्दा उपस्थित

Rahul Gandhi Dedicates Telangana Gig Workers Welfare Law to Platform Workers : तेलंगण सरकारने गिग कामगारांच्या कल्याणासाठी केलेला कायदा राहुल गांधी यांनी कामगारांना समर्पित केला. गिग कामगार अर्थव्यवस्थेचा पाया असल्याचे सांगत त्यांनी भाजप आणि संघाच्या विचारधारेवर टीका केली.
Rahul Gandhi Dedicates Telangana Gig Workers Welfare Law to Platform Workers

Rahul Gandhi Dedicates Telangana Gig Workers Welfare Law to Platform Workers

esakal

Updated on: 

हैदराबाद: तेलंगण सरकारने विविध प्लॅटफॉर्मसाठी काम करणाऱ्या ‘गिग’ कामगारांच्या कल्याणासाठी केलेला कायदा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी या कामगारांना समर्पित केला. हे कामगार अर्थव्यवस्थेचा पाया असून, देशाच्या प्रगतीतील भागीदार आहेत, असे त्यांनी म्हटले. भाजप अन् राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेत अदानी-अंबानी यांसारख्या बड्या भांडवलदारांच्या हिताला प्राधान्य दिले जाते, तर कामगारांना वेठबिगारांसारखी वागणूक दिली जाते, असा आरोपही त्यांनी केला.

Loading content, please wait...