

Rahul Gandhi’s Allegations on Voter Fraud
esakal
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या गंभीर आरोपांसह "एच फाइल्स" नावाची पत्रकार परिषद घेतली. ही परिषद बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील १२१ जागांसाठी मतदानाच्या काही दिवस आधीच आयोजित करण्यात आली होती. यापूर्वी काँग्रेसच्या अधिकृत एक्स हँडलवरून या परिषदेला "हायड्रोजन बॉम्ब लोडिंग" असे संबोधण्यात आले होते.