Naxalites Back Rahul Gandhi’s Vote Rigging Allegations
esakal
काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी आज दिल्लीतील इंदिरा भवन सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोपांचा भडिमार केला. मतदार यादीतून दलित, मागासवर्गीय आणि आदिवासी मतदारांची नावे मुद्दामहून वगळली जात असल्याचा दावा त्यांनी केला. “माझ्याकडे 100 टक्के पुरावे आहेत,” असा दावा करत त्यांनी निवडणूक आयोग मुख्य आयुक्त चोरांना पाठीशी घालत असल्याचा घणाघाती आरोप केला.