Rahul Gandhi: काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयातच फजिती? राहुल गांधींच्या SIR याचिकेत १४ त्रुटी, २२० रुपयेही कमी; सुनावणीच रखडली!

Rahul Gandhi SIR Petition Not Listed for Supreme Court Hearing : इंडिया आघाडीच्या याचिकेत कागदपत्रांच्या त्रुटी आणि शुल्कातील कमतरता आढळल्याने सुनावणी रखडली.
Rahul Gandhi and INDIA alliance leaders submitted a petition challenging the Election Commission’s Special Intensive Revision (SIR) process

Rahul Gandhi and INDIA alliance leaders submitted a petition challenging the Election Commission’s Special Intensive Revision (SIR) process

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : मतदार यादीच्या विशेष सघन पुनरीक्षणाविरोधात (SIR) विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका अद्याप सुनावणीसाठी सूचीबद्ध झालेली नाही. याचिका दाखल करण्याच्या प्रक्रियेत सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीला एकूण १४ त्रुटी आढळल्या आहेत. यामध्ये नऊ नेत्यांच्या मुखत्यारपत्रांवरील सह्या नसणे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या ओळखपत्राची स्पष्ट प्रत उपलब्ध नसणे आणि न्यायालयीन शुल्कात २२० रुपयांची कमतरता असणे, अशा आक्षेपांचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com