Himanta Sharma : राहुल गांधी ग्लॅमरस, पण सद्दाम हुसेनसारखे दिसतात; भाजप नेत्याची जहरी टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

Himanta Sharma: राहुल गांधी ग्लॅमरस, पण सद्दाम हुसेनसारखे दिसतात; भाजप नेत्याची जहरी टीका

नवी दिल्ली - आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपचे स्टार प्रचारक हेमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन केले आहे. राहुल गांधी, त्यांच्या वाढलेल्या दाढीसह, सद्दाम हुसेनसारखे दिसत आहेत, या विधानाचा सरमा यांनी पुनरोच्चार केला आहे. (Rahul Gandhi news in Marathi)

सरमा म्हणाले की, मी फक्त एवढंच म्हणालो की, राहुल गांधी सद्दाम हुसेनसारखे दिसतात, या व्यतिरिक्त मी अजून काहीही बोललो नाही.

हेही वाचा: मोदींनी घडवला इतिहास! निवडणूक प्रचारासाठी केला तब्बल 'एवढ्या' किमीचा 'रोड शो'

याआधी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना हेमंता सरमा म्हणाले होते की, "गांधींच्या वंशाजी प्रतिमा महात्मा गांधी किंवा सरदार पटेल यांच्यासारखी असावी, इराकचे माजी अध्यक्ष सद्दाम हुसेन यांच्यासारखी नव्हे. आताच मी पाहिले आहे की त्यांचा (राहुल गांधी) चेहराही बदलला आहे. तो आता इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेनसारखा दिसत आहे. चेहरा बदलणे ही वाईट गोष्ट नाही. जर तुम्हाला चेहरा बदलायचा असेल तर वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू किंवा गांधीजी यांच्याप्रमाणे करा, पण तुमचा चेहरा सद्दाम हुसेनसारखा का बनत चालला आहे?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा: Maharashtra Karnataka Row: कर्नाटकनं महाराष्ट्राला पुन्हा डिवचलं! जतच्या दुष्काळी भागात सोडलं पाणी

हेमंता यांच्या वक्तव्यावर काँग्रेसकडून तिखट प्रतिक्रिया उमटली होती. दिग्विजय सिंह म्हणाले होते की, ही तीच व्यक्ती आहे जी काँग्रेस नेत्यांचे पाय धरत असे... त्यांना लाज वाटली पाहिजे, आज ते जे काही आहेत ते काँग्रेसमुळेच आहेत.