Ram Mandir : 'राहुल गांधींचं बम बम भोले… तर मोदींचं जय श्रीराम...'; २२ जानेवारीला देशातील 'हे' नेतेही जाणार मंदिरात

उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे येत्या २२ जानेवारीला राम मंदीरात भगवान रामाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.
Rahul Gandhi  Kejriwal Mamata Banerjee will also go to temple PM modi ayodhya ram mandir pran pratishtha
Rahul Gandhi Kejriwal Mamata Banerjee will also go to temple PM modi ayodhya ram mandir pran pratishtha

उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे येत्या २२ जानेवारीला राम मंदीरात भगवान रामाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. सर्व देशाचे लक्ष लागलेल्या या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली असून यापूर्वीच्या विधींनी देखील सुरुवात झाली आहे.

दरम्यान अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातीस अनेक मान्यवरांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहे. तर दुसरीकडे हा कार्यक्रम आरएसएस आणि भाजपचा आहे असं म्हणत काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी राम मंदीर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला जाणार नाही असं सांगितलं आहे.यावरून भाजपकडून काँग्रेस हिंदू विरोधी आहे असा आरोप देखील होत आहे.

या सर्व घडामोडीदरम्यान स्वतःला शिवभक्त म्हणवून घेणारे काँग्रेसचे खासदर राहुल गांधी हे देखील २२ जानेवारी रोजी गुवाहाटीतील लोखर येथे असलेल्या भीमाशंकर ज्योर्तिलिंग दर्शनासाठी जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर राहुल गांधी कामाख्या देवीचं देखील दर्शन घेऊन काँग्रेस हिंदू विरोधी असल्याचा दावा खोडून काढण्याची शक्यता आहे.

Rahul Gandhi  Kejriwal Mamata Banerjee will also go to temple PM modi ayodhya ram mandir pran pratishtha
Man Stuck in lavatory SpiceJet Flight : अरे चाललंय तरी काय! प्रवाशाला विमानाच्या टॉयलेटमध्ये बसून करावा लागला प्रवास; अखेर...

अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असणार आहेत. राम मंदिरात राम लल्लाची प्राण प्रतिष्ठा त्यांच्या उपस्थितीत होणार आहे, तेव्हाच राहुल गांधी हे गुवाहाटीतील लोखर येथील भीमाशंकर ज्योर्तिलिंगात पूजा करतील असं सांगितलं जात आहे.

Rahul Gandhi  Kejriwal Mamata Banerjee will also go to temple PM modi ayodhya ram mandir pran pratishtha
PM मोदींच्या गावात सापडली अडीच हजार वर्षांपूर्वीची मानवी वसाहत; समोर आला Video

इंडिया आघाडीतील नेतेही जाणार मंदिरात -

२२ जानेवारी रोजी देशभरातील वेगवेगळ्या मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा दिवस दिवाळीप्रमाणे साजरा करण्याचे अवाहन देखील केले जात आहे. यादरम्यान विरोधकांच्या इंडिया आघाडीतील नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील दिल्लीत सुंदर कांडचं पठण करणार आहेत. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जी या कोलकाता इथे काली मातेची पूजा करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com