Man Stuck in lavatory SpiceJet Flight : अरे चाललंय तरी काय! प्रवाशाला विमानाच्या टॉयलेटमध्ये बसून करावा लागला प्रवास; अखेर...

मुंबई-बेंगळुरू स्पाइसजेट फ्लाइटमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण विमान प्रवासादरम्यान एक पुरुष प्रवाशाला शंभर मिनीटं टॉयलेटमध्ये अडकून पडावे लागले.
Man Stuck in lavatory SpiceJet Flight
Man Stuck in lavatory SpiceJet Flight

Man Stuck in lavatory SpiceJet Flight : मुंबई-बेंगळुरू स्पाइसजेट फ्लाइटमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण विमान प्रवासादरम्यान एक पुरुष प्रवाशाला शंभर मिनीटं टॉयलेटमध्ये अडकून पडावे लागले. मंगळवारी पहाटे हा प्रकार घडला.

अखेर बंगळुरू येथील केम्पेगौडा विमानतळावर विमान उतरल्यानंतर अभियंत्यांनी शौचालयाचा दरवाजा तोडला आणि त्यानंतर या अडकून पडलेल्या प्रवाशाला बाहेर काढण्यात आले. टॉयलेटमध्ये अडकल्याने प्रवाशाला यामुळे प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले.

या विमानाने मुंबई विमानतळावरून मंगळवारी रात्री 2 वाजता उड्डाण केले होते. रिपोर्टनुसार, विमानाने उड्डाण घेतल्यानंतर प्रवासी लगेचच टॉयलेटमध्ये गेला, त्यानंतर तो संपूर्ण प्रवासात अडकून पाडला होता. हा प्रवासी तब्बल 100 मिनीटं टॉयलेटमध्ये अडकला होता.

Man Stuck in lavatory SpiceJet Flight
India-China Border Tension : गलवान चकमकीनंतर चीनचा दोनदा हल्ल्याचा प्रयत्न; भारतीय जवानांनी दिलं चोख प्रत्युत्तर

स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, 16 जानेवारी रोजी दुर्दैवाने एक प्रवासी मुंबई ते बंगळुरू स्पाइसजेट विमान प्रवासादरम्यान लॅव्हीटरी मध्ये तासभार अडकून पडाला.विमान हवेत असताना टॉयलेटचा दरवाज्याचे कुलूप खराब झाल्याने हा प्रकार घडला. संपूर्ण प्रवासात, आमच्या क्रूने प्रवाशाला मदत आणि मार्गदर्शन केले. विमान उतरल्यानंतर एका अभियंत्याने शौचालयाचा दरवाजा उघडला आणि प्रवाशाला तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली.

Man Stuck in lavatory SpiceJet Flight
PM मोदींच्या गावात सापडली अडीच हजार वर्षांपूर्वीची मानवी वसाहत; समोर आला Video

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com