Rahul Gandhi : बिहारमध्ये ‘व्होटर अधिकार’ यात्रा काढणार, राहुल यांची घोषणा; येत्या १७ ऑगस्टपासून सुरुवात करणार
Voter Rights Yatra : राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस १७ ऑगस्टपासून बिहारमध्ये ‘मतदार अधिकार यात्रा’ काढणार असून मतचोरीविरोधात १३०० किमीचा जनसंवाद होणार आहे.
नवी दिल्ली : मतदार याद्यांमधील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मतचोरीचा आरोप करणाऱ्या काँग्रेसने बिहारमध्ये व्होटर अधिकार (मतदार अधिकार) यात्रेच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वातावरण तापविण्याची तयारी केली आहे.