Rahul Gandhi Presents Proof of Duplicate Votes | Congress Demands Probe into Voter List Scam : राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा बिहारमधील मतदार यादी पूनसर्वेक्षणावरून निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं आहे. राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत थेट पुरावेच सादर केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घोळ झाल्याचाही आरोप केला. तसेच अनेक निवडणुकीत एका व्यक्तीने तीन वेळा मतदान केल्याचंही त्यांनी म्हटलं. राहुल गांधींच्या या आरोपानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.